महादीप परीक्षा सराव पेपर-10 | Mahadeep Test Paper-10
Mahadeep Test Paper: महादीप परीक्षा 2024-25 सराव करण्यासाठी आम्ही आपणासाठी महादीप परीक्षा सराव पेपर-10 देत आहोत. Madeep Test Paper-10 हा सराव पेपर 50 प्रश्नांचा असणार आहेत. प्रश्नाच्या खालीच उत्तर असणार आहे परंतू प्रथमतः प्रश्न वाचून उत्तरासाठी विचार करा आणि नंतरच उत्तर पहा.
महादीप परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना विनंती कि,त्यांनी आपल्या मुलांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्यासाठी ह्या पेपरचा सराव करून घ्यावा. असेच सराव पेपर आम्ही आपणासाठी महादीप परीक्षेच्या सरावासाठी पुढेही उपलब्ध करून देवू.
नक्कीचं आपणास या सराव पेपरचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रानो हा सराव आपणास कसा वाटला हे खाली Comment करून कळवायला विसरू नका.
1. जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
बुलढाणा
2. महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी किती आहे ?
800 किमी
3. महाराष्ट्राचा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
अहिल्यानगर
4. महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती ?
6 विभाग
5.महाराष्ट्रातील तलावाचा जिल्हा कोणता ?
भंडारा
6. महाराष्ट्रातील / विदर्भातील पांढऱ्या सोन्याचा जिल्हा कोणता ?
यवतमाळ
7.महाराष्ट्रातील पहिला रेल्वे मार्ग कोणता ?
मुंबई ते ठाणे
8. गावचा प्रथम नागरिक कोण असतो ?
सरपंच
9. भारतीय राष्ट्रीय ध्वजावर वरच्या भागाला कोणता रंग आहे?
केशरी
10. महाराष्ट्रातील कोणत्या विभागातील नद्या कमी लांबीच्या आहेत ?
कोकण
11. ग्राम पंचायतची निवडणूक किती वर्षांनी होते ?
दर 5 वर्षांनी
12. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाही ?
2 (मुंबई शहर व मुंबई उपनगर)
13. कोणत्या शहराला दक्षिणेची काशी म्हणतात ?
नाशिक
14. महाराष्ट्रातील कोणत्या विभागात आर्थिक संपन्न वने आहेत ?
नागपूर
15. क्रिकेट खेळाच्या एका टिममध्ये खेळणारे किती खेळाडू असतात ?
11
16. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता विभाग सर्वात मोठा आहे ?
मराठवाडा(औरंगाबाद)
17. महाराष्ट्रातील नदी प्रणालीचे सर्वात कमी क्षेत्र कोणत्या नदीचे आहे ?
कृष्णा नदी
18. महाराष्ट्रातील पूर्व वाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे ?
65 %
19. विदर्भात डोलोमाईट कोणत्या जिल्ह्यात आढळतात ?
नागपूर , यवतमाळ
20. ‘सिंहगड’ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
पुणे
21. ‘चिमासाहेबी’ ही कोणत्या पिकाची जात आहे ?
द्राक्षे
22.जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे?
नाथसागर
23.ओरस-बुद्रुक हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे ?
सिंधुदुर्ग
24. ‘नवेगाव राष्ट्रीय बांध’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
गोंदिया
25. संत गाडगे महाराजांचे जन्मगाव कोणते ?
शेणगाव
26. कृष्णा नदी कोठे उगम पावते ?
महाबळेश्वर
27. महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणते राज्य आहे ?
छत्तीसगड
28. ‘विष्णुपूरी’ प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
नांदेड
29. कोकणातील मुख्य पिक कोणते ?
फणस
30. महाराष्ट्र राज्याच्या सागर किनारपट्टीची लांबी किती ?
720 किमी
31.महाराष्ट्राचे ‘मॅचेस्टर’ कोणत्या शहराला म्हणतात ?
इचलकरंजी
32. मुर्तीजापूर-यवतमाळ हा रेल्वे मार्ग कोणत्या गेज प्रकारचा आहे ?
नॅरोगेज
33. महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात एकही साखर कारखाना नाही ?
कोकण विभाग
34. शिवजयंती तारखेनुसार कोणत्या तारखेला साजरी करतात ?
19 फेब्रुवारी
35.प्रवरा नदीच्या खोऱ्यात कोणते पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते ?
ऊस
36. हिमरूशाली करीता प्रसिद्ध असलेले शहर कोणते ?
छत्रपती संभाजीनगर
37.नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे ?
गोदावरी
38. सुवर्णकन्या पी. टी. उषा कोणत्या बाबीसाठी प्रसिद्ध आहे ?
धावणे
39. महाराष्ट्रात चामड्याच्या वस्तु बनविण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात कोणत्या जिल्ह्यात चालतो ?
कोल्हापूर
40. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म गाव कोणते ?
महू
41. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळविणारच’ ही गर्जना कोणी केली ?
लोकमान्य टिळक
42. बाबा आमटेंचे ‘आनंदवन’ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
चंद्रपूर
43.’शिक्षक दिन’ केंव्हा साजरा करतात ?
5 सप्टेंबर
44.महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्याचा प्रकार कोणता ?
लावणी
45. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता ?
हरियाल
46. विदर्भात बोलल्या जाणाऱ्या भाषेला काय म्हणतात ?
वऱ्हाडी
47. ‘ज्ञानेश्वरी’ग्रंथ कोणी लिहीला?
संत ज्ञानेश्वर
48.’बिबी का मकबरा’ कोठे आहे ?
छत्रपती संभाजीनगर
49. विदर्भातील सर्वात मोठे शहर कोणते ?
नागपूर
50. राजमाता जिजाऊचे जन्म गाव कोणते ?
सिंदखेडराजा