सॅलरी बँक अकाऊंटवर फुकटात मिळतात ‘या’ १० सुविधा ! | salary account benefits
salary account benefits:- कर्मचाऱ्याचा दरमहिन्याचा पगार बँकेत ज्या अकाऊंटला जमा होतो त्या अकाऊंटला सॅलरी अकाऊंट म्हणतात. हे खाते आपल्या नियमित इतर खात्यांप्रमाणेच असतं. परंतू यात तुम्हाला बँकेकडून अनेक ऑफर्स, सुविधा मिळतात पण फार कमी जणांनाच याबद्दल माहिती असते.
हा लाभ salary account benefits in hdfc, salary account benefits in sbi, salary account benefits bank of maharashtra, salary account benefits in icici bank, salary account benefits comparison, salary account benefits hdfc bank, salary account benefits in axis bank, salary account benefits in bank of baroda, salary account benefits in sbi bank अशा सर्वच बँकात मिळतो.
आपण अशा १० सुविधांबद्दल जाणून घेऊया.
1. विमा संरक्षण:- काही सॅलरी अकाऊंट्सवर अपघाती मृत्यू कवच किंवा आरोग्य विमा संरक्षण मिळते.
2.ओव्हरड्राफ्ट सुविधा:-सॅलरी अकाऊंट्समध्ये ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध असते. ज्यामुळे तुमच्या खात्यात पैसे नसले तरी आपत्कालीन परिस्थितीत पैसे काढू शकता.
3.उत्तम व्याजदराने कर्ज:-सॅलरी अकाऊंट्सवर वर ग्राहकांना वैयक्तिक कर्ज आणि गृहकर्जावर चांगले व्याजदर मिळतात. अनेक बैंक तुम्हाला कमी व्याजावर कर्ज देतात.
4.प्राधान्य सेवा:- अनेक बँका सॅलरी अकाऊंट होल्डर्सना प्राधान्य सेवा देतात. ज्यामध्ये तुम्हाला जलद सेवा, विशेष ग्राहक सेवा क्रमांक आणि विशेष ऑफर मिळतात.
5.क्रेडिट कार्ड ऑफर:- अनेक बँका सॅलरी अकाऊंट्सवर मोफत क्रेडिट कार्ड आणि उत्तम ऑफर देतात. यामध्ये वार्षिक फी आणि रिवॉर्ड पॉइंट्समध्ये सवलतीचा समावेश असतो.
6.ऑनलाइन शॉपिंग आणि डिनर ऑफर:- बँका सॅलरी अकाऊंट्स होल्डर्सना ऑनलाइन शॉपिंग आणि डिनरच्या ऑफर्स देतात. यामध्ये सूट आणि कॅशबॅकचा समावेश असतो.
7.मोफत चेक बुक आणि डेबिट कार्ड:- बँका अनेकदा सॅलरी अकाऊंट होल्डर्सना मोफत चेकबुक आणि डेबिट कार्ड सेवा देतात. असे छोटे छोटे खर्च तुमच्या बचतीचे कारण बनू शकतात.
8.डिजिटल बैंकिंगची मोफत सेवा:- सॅलरी अकाऊंटमध्ये एनईएफटी, आरटीजीएससारख्या डिजिटल सेवा अनेक ठिकामी विनामूल्य असतात. ज्यामुळे कॅश ट्रान्सफर सोपे होते.
9.मोफत एटीएम व्यवहार:- सॅलरी अकाऊंटमध्ये सर्वसाधारणपणे मोफत ट्रान्झाक्शन दिले जातात. तुमच्या गरजेनुसार कोणताही एक्स्ट्रा चार्ज न देता तुम्ही कॅश काढू शकता.
10.झिरो बॅलेन्सचे फायदे:- सॅलरी अकाऊंट्समध्ये झिरो बॅलन्सचा फायदा मिळतो. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची काळजी करण्याची गरज नाही. सेव्हिंग अकाऊंट्समध्ये ही सुविधा नसते.
या सर्व सुविधा सॅलरी बँक अकाऊंटवर फुकटात मिळतात मात्र बँका आपल्याला सांगत नाहीत, खूपच कमी लोकांना याची माहिती असते.
ह्या सुविधाचा लाभ बँकेला भेटून नक्की घ्या.