किरकोळ रजा अर्ज PDF, Kirkol Rajecha Arj PDF

By Neha

Updated On:

Teacher-Kirkol-Raja-Arj
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

किरकोळ रजा अर्ज PDF, Kirkol Rajecha Arj PDF

किरकोळ रजा / नैमित्तिक रजा (Casual Leave) ह्या वर्षाला 12 मिळतात. कोणत्या महिन्यात किती सुट्ट्या घ्याव्या असा काही लिखित नियम नाही,तरीसुद्धा महिन्याला एक रजा याप्रमाणे बारा महिन्याच्या बारा सुट्ट्या अशा पकडल्या जातात. कधी-कधी या सुट्ट्या महिन्याला दोन,तीन किंवा चारही घेता येतात. किरकोळ रजा ही अर्ध्या दिवसाची सुद्धा घेता येते.ती सुद्धा वर्षाच्या बारा सुट्ट्यात मोजल्या जाते.

एकंदरीत एका कॅलेंडर वर्षात म्हणजे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या दरम्यान केव्हाही या सुट्ट्या घेता येतात. किरकोळ रजा मात्र एका कॅलेंडर वर्षात जर घेतली नाही तर त्या व्यपगत (lapsed) होतात परत त्या पुढील कॅलेंडर वर्षात घेता येत नाही. पुढील नवीन कॅलेंडर वर्षात नवीन बारा रजा परत शिक्षकाच्या खात्यात जमा होतात किंवा त्याला मिळतात असा नियम आहे.

Kirkol Rajecha Arj PDF:- किरकोळ रजेचा अर्ज हा शाळा स्तरावर शिक्षकासाठी अत्यंत महत्वाचा अर्ज आहे. किरकोळ रजेचा अर्ज जेव्हा शिक्षक कोणत्याही कामानिमित्त एक, दोन किव्हा जास्तीत जास्त सात दिवसाकरिता सुट्टीवर जात असेल तेव्हा हा अर्ज त्याला मुख्याध्यापकाकडे द्यावा लागतो.

किरकोळ रजेचा अर्ज शिक्षकाने मुख्याध्यापकाकडून अगोदरच मंजूर करावा अशी अपेक्षा असते परंतु एखाद्या परिस्थितीत तात्कालीक कारण आले असता किंवा अचानक तब्येत बिघडली असता किरकोळ रजेचा अर्ज हा दुसऱ्या करवी शाळेत पाठविता येतो व मजूर करून घेता येतो.

kirakol raja arj असा एक फॉरमॅट आहे,ज्या फॉरमॅटच्या आधारे शिक्षक हा मुख्याध्यापकाला किरकोळ रजेची मागणी करू शकतो. किरकोळ रजेचे विविध नमुने आपणास दिसून येतात. त्यातले काही नमुने आज आपण या पोस्टमध्ये बघणार आहोत.

किरकोळ रजेचा अर्ज नमुना pdf या नमुनाच्या सहाय्याने शिक्षक बांधवांचे काम अतिशय सोपे होणार आहे. त्यांचा वेळ वाचणार आहे. त्यांना हा अर्ज डाउनलोड करून प्रिंट काढून येईल. शिक्षक बांधवांना विनंती आहे की,या अर्जाच्या प्रिंट काढून आपल्या जवळ जपून ठेवाव्यात जेव्हा गरज असेल तेव्हा विशिष्ठ ठिकाणी लेखन करून या अर्थाचा वापर करावा.

Kirakol Raja pdf File

किरकोळ रजा / नैमित्तिक रजा (Casual Leave) ही नेमकी याच कारणासाठी घ्यावी असा काही लिखित नियम नाही जर अचानक तब्येत बिघडली असता, एखाद्या किरकोळ काम आले असता, तत्कालीक कोणतेही कारण असो किंवा शिक्षकाचे खाजगी काम असल्यास त्याला या रजेचा वापर करता येतो. किरकोळ रजा ही शिक्षकांच्या हक्काची रजा आहे. तो ती रजा वर्षातून केव्हाही घेवू शकतो.

महाराष्ट्र नागरी सेवा रजा अधिनियम १९८१ नुसार किरकोळ रजा / नैमित्तिक रजा ह्या एकाचं वेळी सुट्टीचा दिवस धरून सलग 7 (सात) दिवसापेक्षा जास्त घेता येत नाही.

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना राज्य शासनाने राजपत्रातील अधिसुचनेद्वारा जाहीर केलेल्या सण व इतर सुट्ट्या वगळून प्रतीवर्ष महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ अन्वये खाते प्रमुखाकडे अर्ज देऊन, तो मान्य झाल्यावर किरकोळ रजा उपभोगता येते. kirkol raja म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ अन्वये सक्षम प्राधिकाऱ्याने / मुख्याध्यापकाने कामावर अनुपस्थित राहण्यास दिलेली परवानगी.

किरकोळ रजेसंदर्भात ठळक बाबी:-

  • हक्क म्हणून रजा मागता येत नाही.
  • रजा मंजूर करण्यास सक्षम अधिकाऱ्यास आवश्यकतेनुसार रजा नाकारण्याचा/रद्द करण्याचा अधिकार असतो.
  • पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते.
  • रजा संपल्यावर कर्मचाऱ्याला कामावर रुजू व्हावे लागते.
  • सार्वजनिक सुट्टीस जोडून / अधेमधे घेता येईल.
  • सेवा पुस्तकात नोंद नाही / स्वतंत्र नोंदवहीत हिशोब ठेवणे.
  • रजा संपल्यावर कर्मचाऱ्याला कामावर रुजू व्हावे लागते.
  • ही रजा म्हणजे कर्तव्य काळातून दिलेली तात्पुरती सूट.

Kirakol Raja pdf File 2

आम्ही आपल्यासाठी या पोस्टमध्ये किरकोळ रजा अर्ज नमुना pdf, किरकोळ रजा अर्ज नमुना मराठी pdf, रजा अर्ज नमुना मराठी हा kirkol raja excel in marathi (एक्सेल),  kirkol raja word in marathi (वर्ड), kirkol raja pdf in marathi (पीडीएफ) या तिन्ही प्रकारचे नमुने देत आहोत. आपल्याला या तिन्ही प्रकारातील नमुन्जोयापैकी जो नमुना उपयोगी असेल किव्हा आपल्या आवडीचा असेल तो वापरून त्याचा वापर करावा.

📝किरकोळ रजेचे विविध अर्ज डाउनलोड करा.

👉 शिक्षक किरकोळ रजा अर्ज  pdf नमुना (1)

👉 शिक्षक किरकोळ रजा अर्ज  pdf नमुना (2)

👉 शिक्षक किरकोळ रजा अर्ज Excel File

👉 शिक्षक किरकोळ रजा अर्ज Word File

  टीप:-✍️ किरकोळ रजा Excel फाईल, किरकोळ रजा word फाईल एडीट कशी करावी.

1)प्रथमता आपल्या कॉम्प्यूटर अथवा LAPTOP मध्ये कोकिळा
हा FONT टाकून घ्या,म्हणजे ही EXCEL FILE आपल्याला
जशीच्या तशी वापरता येईल.
 
2)हा FONT या पोस्ट मध्ये खाली DOWNLOAD साठी दिलेला आहे.
 
३)या FILE मधील लाल अक्षरात असलेल्या जागीच आपण बदल करावा
जेणेकरून आपल्याला प्रभार यादी देताना सोयीचे होईल.
 
४)आपल्याला नको असलेल्या रो (ROW) आपण डिलीट करू शकता.
या FILE ला आपल्या मताप्रमाणे वापरू शकता.
 
कोकिला फोन्ट खालील लिंकला क्लिक करून आपण डाउनलोड करू शकता. 👇

Leave a Comment