मुख्याध्यापक चार्ज देवाणघेवाण यादी PDF व EXCEL, HM चार्ज यादी PDF व EXCEL
मुख्याध्यापक चार्ज देवाणघेवाण:- mukhyadhyapak charj devan ghevan pdf,excel
जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असताना कधी ना कधी तरी मुख्याध्यापक पदाचा प्रभार येत असतो. एका शाळेवरून दुसऱ्या शाळेत बदली झाली, तालुका बदली झाली, जिल्हा बदली झाली किव्हा इतर कारणाने बदली झाली तरी मुख्याध्यापकाचा चार्ज देवाण-घेवाण करावा लागतो.
मुख्याध्यापक चार्ज कुणाकडे द्यावा:-
एखाद्या शाळेवरती मुख्याध्यापकाचे पद मंजूर असताना कार्यरत मुख्याध्यापकाने नेमून दिलेल्या कर्तव्य सुचीनुसार कार्यभार सांभाळणे, मुख्याध्यापकाचे कामकाज व जबाबदाऱ्या पार पाडणे त्याच्यावर बंधनकारक असेल.
शाळेमध्ये सदरचे पद रिक्त असेल तर त्याच शाळेतील सेवाजेष्ठ पदवीधर शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा प्रभार देण्यात येतो. जर शाळेमध्ये पदवीधर शिक्षकाचे पद रिक्त असेल तर त्याच शाळेतील सेवाजेष्ठ शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा प्रभार देण्यात येतो. मुख्याध्यापक चार्ज देवाण-घेवाण करत असताना सेवाजेष्टता विचारात घेतली जाते.
मुख्याध्यापक पदाचा प्रभार सांभाळण्याचा आदेश पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांचे कार्यालयाकडून देण्यात येतात. समजा तसा आदेश नाही आला तरी नियमानुसार वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रभार सांभाळण्याची प्रक्रिया पार पडते.
चार्जपट्टी किव्हा प्रभार देवाणघेवाण यादी म्हणजे काय?
HM Carj devan ghevan yadi pdf: मुख्याध्यापक चार्ज सोडताना किव्हा घेताना आपसात मुख्याध्यापक चार्ज देवाण-घेवाण पार पडते. शाळेत असणाऱ्या सर्व साहित्याचे हस्तांन्तरण प्रभार घेताना व देताना होत असते.
पूर्वीच्या मुख्याध्यापकाने नवीन मुख्याध्यापकाला लिखित स्वरुपात चार्ज देवाण घेवाण यादी द्यावयाची असते.
या यादीत शाळेतील प्रभार हस्तांतरित करताना संपूर्ण वस्तू,रजिस्टर,नोंदवह्या,दाखल खारीज रजिस्टर आदि संपूर्ण रेकॉर्ड ची यादी द्यावी लागते यालाच mukhyadhyapak charj devan ghevan / मुख्याध्यापक चार्ज देवाण घेवाण यादी PDF यादी म्हणतात. मुख्याध्यापक चार्ज देवाणघेवाण यादी excel.
चार्ज देवाण घेवाण घेताना घ्यावयाची काळजी-
चार्ज देवाण घेवाण करताना आपण जी यादी तयार करतो त्यामध्ये पुढील बाबींचा उल्लेख असल्याची काळजी घेणे आवश्यक असते .
१) चार्ज देणारा आणि घेणारा यांच्या नावाचा यादीत उल्लेख स्पष्ट असावा.
२) चार्ज दिल्याची व घेतल्याची तारीख यादीत अचूक नमूद करावी.
३) जर चार्ज कोणाच्या समक्ष घेतला असेल तर त्याचे नाव लिहावे.
४) चार्ज यादी तपासून अचूक असल्याची खात्री झाल्यास व यादीवर दोघांनीही स्वाक्षरी करावी.
५) शाळेत कुठलेही बांधकाम अथवा इतर कोणते काम सुरु असेल तर त्यांची नोंद चार्जपट्टी मध्ये करावी.
६) कार्यालयीन खाते बुक जसे की,दाखल खारीज रजिस्टर, स्टाॅक बुक आदी महत्वाच्या रजिस्टर च्या नोंदी अचूक असाव्या.
७) चार्ज यादीत बँकेचे पास बुक व त्यामधील शिल्लक रक्कम याची नोंद करावी.
८) चार्ज यादीत साहित्याचे नाव व त्याची संख्या अचूक नोंदवावी.
९) कांही अपूर्ण असेल तर त्याची नोंद करण्यात यावी.
१०) बदली अथवा कोणत्या कारणामुळे चार्ज देत आहात किंवा घेत आहात तो आदेश या सर्व बाबींची माहितीची नोंद करणे आवश्यक असते.
मुख्याध्यापक चार्ज देवाणघेवाण यादी विविध डाउनलोड करा.
👉 मुख्याध्यापक चार्ज देवाणघेवाण pdf नमुना (1)
👉 मुख्याध्यापक चार्ज देवाण घेवाण pdf नमुना (2)
👉 मुख्याध्यापक चार्ज देवाण घेवाण Excel File
👉 मुख्याध्यापक चार्ज देवाण घेवाण Excel File कोरी File
टीप- Excel फाईल एडीट करताना घ्यावयाच्या सुचना:-
१) मुख्याध्यापक चार्ज देवाणघेवाण यादी EXCEL मधील फाईल मध्ये काम करताना आपल्या कॉम्प्यूटर अथवा LAPTOP मध्ये कोकिला हा FONT टाकून घ्या,म्हणजे ही EXCEL FILE आपल्याला जशीच्या तशी वापरता येईल.
(कोकिला फोन्ट नसेल तरी चालेल ही फाईल अपोआप Unicode फोन्ट ला सपोर्ट करेल.)
2) हा FONT या पोस्ट मध्ये खाली DOWNLOAD साठी दिलेला आहे.
३) या FILE मधील लाल अक्षरात असलेल्या जागीच आपण बदल करावा जेणेकरून आपल्याला प्रभार यादी देताना सोयीचे होईल.
४) आपल्याला नको असलेल्या रो (ROW) आपण डिलीट करू शकता. या FILE ला आपल्या मताप्रमाणे वापरू शकता.
कोकिला फोन्ट खालील लिंकला क्लिक करून आपण डाउनलोड करू शकता. 👇
कोकिला फोन्ट कसा इंस्टाॅल करावयाचा? खालील व्हिडीओ तुम्ही पाहून इंस्टाॅल करू शकता.👇