Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

स्वयंघोषणापत्र नमुना | Self Declaration marathi form | स्वयंघोषणापत्र pdf download

शासकीय सोयी / सुविधा करिता अगोदर शपथपत्र स्वीकारल्या जात होते आता शपथपत्राऐवजी स्वयंघोषणापत्रकागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती स्विकारण्यात याव्यात असा दिनांक: ०९ मार्च, २०१५ रोजी शासन निर्णय घेण्यात आला.

स्वयंघोषणापत्र म्हणजे काय:-

what is self declaration form | self declaration form meaning in marathi

“कोणत्याही साध्या कागदावर लिहिलेले किवा मुद्रित केलेले ‘स्वयंघोषणापत्र‘ म्हणजेच कायद्याच्या भाषेत प्रतिज्ञापत्र होय. यालाच स्वयंघोषणापत्र किव्हा स्व घोषणा प्रमाणपत्र असे म्हणतात.” स्वयंघोषणापत्रातील माहिती ही लिहून देणाऱ्या व्यक्तीस बंधनकारक असते.

महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य इत्यादि शासकीय संस्थामध्ये विविध दाखले, अनुज्ञप्ती व इतर शासकीय सेवा / सुविधा प्राप्त करुन घेण्याकरिता नागरिकांना सादर करावे लागणारे शपथपत्र (Affidavit), तसेच मुळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे यांच्या राजपत्रित अधिकारी / विशेष कार्यकारी अधिकारी इत्यादी. सक्षम अधिकाऱ्यांनी साक्षांकित केलेल्या प्रती (Attested copies) सादर कराव्या लागतात. परिणामी नागरिकांची गैरसोय होते. ही गैरसोय दूर करण्याकरिता यामुळे नागरिकांना होणारी असुविधा दूर करण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये शपथपत्र, प्रमाणपत्र तसेच साक्षांकित प्रती ऐवजी शक्य तेथे स्व घोषणा प्रमाणपत्र तसेच स्वयंसाक्षांकित प्रती स्वयंघोषणापत्र नमुना Self Declaration marathi form स्विकृत करण्याची एक कार्यपध्दती अंमलात आणण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

संदर्भाधीन शासन निर्णय अधिक्रमित करुन सर्व शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य इत्यादि शासकीय संस्थामध्ये शपथपत्र (Affidavit), ऐवजी स्वयं घोषणापत्र (Self Declaration) self declaration letter format in marathi व प्रमाणपत्रे / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती (Attested copies) ऐवजी स्वयंसाक्षांकित प्रती (Self Attested Copies) स्वीकृत करण्या संदर्भात पुढीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत –

अ) शपथपत्र (Affidavit) ऐवजी स्वयं घोषणा पत्र (Self-Declaration) self declaration format in marathi स्विकारणे – शासकीय कामकाज तसेच सेवा/ सुविधांकरिता अनेक शासकीय कार्यालयांकडून अर्जासह शपथ पत्राची मागणी करण्यात येते. जेथे जेथे विद्यमान कायदा / नियम याव्दारे शपथपत्र अर्जासह सादर करणे आवश्यक आहे. तेथे शपथ पत्र सादर करणे आवश्यक राहील. मात्र जेथे अशा प्रकारे शपथपत्र बंधनकारक नाही. तेथे शपथ पत्राची मागणी करण्यात येऊ नये. त्या सर्व प्रकरणी शपथपत्राऐवजी स्वघोषणापत्र (Self Declaration) घेण्यात यावे. स्वघोषणापत्र प्रपत्रअ प्रमाणे राहील.

ब) मुळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे यांच्या (Attested copies) साक्षांकित प्रतीऐवजी स्वयं साक्षांकित प्रती (Self Attested Copies) स्वीकारणे :-शासकीय कामकाज तसेच शासकीय सेवा / सुविधा करिता अर्जासह मुळ प्रमाणपत्रांच्या / कागदपत्रांच्या प्रती राजपत्रित अधिकारी / विशेष कार्यकारी अधिकारी / इतर सक्षम अधिका-यांनी साक्षांकित केल्यानंतर स्विकारल्या जातात. जेथे जेथे विद्यमान कायदा / नियम याव्दारे अशा साक्षांकित प्रतींची आवश्यकता आहे. तेथे अशा साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक राहील. मात्र जेथे अशा प्रकारे साक्षांकन बंधनकारक नाही त्या सर्व प्रकरणी स्वयं साक्षांकित प्रती स्विकारण्यात याव्यात. तेथे साक्षांकित प्रतींची मागणी करण्यात येऊ नये. मात्र स्वयंसाक्षांकित प्रतींसह त्यांच्या सत्यतेबाबत स्वघोषणापत्र सोबत जोडलेल्या प्रपत्र व प्रमाणे घेण्यात यावे.

क) वरील दोन्ही स्वघोषणापत्रे self declaration format हे साध्या कागदावर करता येतील त्याकरिता न्यायिक कागदाची आवश्यकता नाही.

ड) स्वघोषणा प्रमाणपत्रावर नागरिकाने जर चुकीची / खोटी माहिती दिल्यास त्याबाबत संबंधित नागरिकावर भा.दं. वि. मधील तरतूदी तसेच इतर अधिनियमातील तरतूदीनुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असा स्पष्टपणे उल्लेख विहित नमुन्यातील अर्जामधील अटी व शर्तीमध्ये करण्यात यावा.

इ) स्व घोषणा प्रमाणपत्रावर संबंधित नागरिकाचे सुस्पष्ट तसेच अलिकडच्या काळातील छायाचित्र (फोटो) असावे. उपलब्ध असल्यास त्यावर संबंधित नागरिकाचा आधार क्रमांक देखील नमूद करण्यात यावा.

नागरी सुविधा केंद्र

अ) राज्यातील सर्व नागरीक सुविधा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र, सेतु केंद्र इ. केंद्रामध्ये वरील प्रमाणे स्वघोषणा पत्रकागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती व त्यांच्या सत्यतेबाबत स्वघोषणा पत्र स्विकारण्याची कार्यवाही करावी.

ब) शपथपत्राऐवजी स्वघोषणा पत्र व स्वयंसाक्षांकितप्रती संदर्भात स्वघोषणा पत्र हे अर्जाचाच भाग राहतील ते साध्या कागदावर घेण्यात यावे त्यासाठी न्यायिक कागदाची आवश्यकता नाही. आपल्याला self declaration form marathi pdf download करता येतील.

कोणत्या कामासाठी स्वयंघोषणा पत्र आवश्यक आहे व कोणत्या कामासाठी स्वयंघोषणा पत्र आवश्यक नाही ते पहा.

खालील नमुद दाखल्याकरिता शपथपत्राची आवश्यकता आहे

1जात प्रमाणपत्र भारत सरकार कामा करिता
2जात प्रमाणपत्र स्थलांतरन झालेल्या करिता
3मराठा जात दाखला
4मुस्लीम जात दाखला
5नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र- मराठा जात
6नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र- मुस्लीम जात
7नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र नुतनीकरण मराठा जात
8नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र नुतनीकरण मुस्लीम जात
9नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र
10नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र नुतनीकरण
11इतर मागासवर्गीय जात दाखला
12विशेष मागासवर्गीय जात दाखला
13अनुसूचित जात दाखला
14इतर मागासवर्गीय जात दाखला
15अनुसूचित जमाती दाखला
16विमुक्त जात / भटक्या जात दाखला

खालील नमुद दाखल्याकरिता किव्हा सेवांकरिता शपथपत्राची आवश्यकता नाही, स्वयंघोषणापत्र घेता येईल.

अ.क्र.सेवा
1वय राष्ट्रीयत्व व अधिवास दाखला
2अल्प भुधारक शेतकरी दाखला
3जन्म दाखला
4मृत्यु दाखला
5वंशावळीचे प्रतीज्ञापत्र
6सर्वसाधारण प्रतीज्ञापत्र
7वारसाहक्क प्रमाणपत्र
8उत्पन्न दाखली
9सांस्कृतिक कार्यक्रम (प्रदर्शन) परवाना
10खाण भाडेपट्याने देणे
11खाण परवाना
12रहिवासी दाखला
13जेष्ठ नागरिक दाखला
14पत (ऐपतीचा) दाखला
15दगड फोडण्याचा परवाना
16दगड खाण भाडपात्याने देणे
17प्रमाणित प्रत (जिल्हाधिकारी कार्यालय)
18प्रमाणित प्रत (उपविभागीय कार्यालय)
19प्रमाणित प्रत (तहसिल कार्यालय)
20प्रमाणित प्रत- भुमी अभिलेख
21प्रमाणित प्रत सहीसह
22डोंगरी प्रमाणपत्र
23शेतकरी प्रमाणपत्र
24भूमिहीन शेतकरी दाखला
25अधिकार अभिलेखात नाव नोंदणी अर्ज
26अकृषिक (N.A) परवाना
27प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र
28प्रकल्पग्रस्त लोकांचे मालकी हस्तातरंण करणे
29शस्त्र परवाना / नुतनीकरण
30केबल चालक परवाना
31केबल चालक परवाना नुतनीकरण
32स्फोटके विक्री परवाना
33रेस्टॉरंट परवाना
34हॉटेल परवाना
35लॉजिंग व बोडिंग परवाना
36दुय्यम (डुप्लीकेट) रेशन कार्ड देणे
37नवीन रेशन कार्ड देणे
38जुने रेशन कार्ड रदद् करुन नवीन रेशन कार्ड देणे
39रेशन कार्ड मध्ये नाव वाढवणे
40रेशन कार्ड मध्ये नाव कनी करणे
41रेशन कार्ड नुतनीकरण करणे
42विभक्त रेशन कार्ड देणे
43३० % महिला आरक्षण प्रमाणपत्र
44इंदिरा गांधी सामाजिक कल्याण योजना
45संजय गांधी सामाजिक कल्याण योजना
46श्रावण बाळ सामाजिक कल्याण योजना
47कौटुंबिक अर्थ सहाय्य

स्वयंघोषणा पत्र डाऊनलोड

तुम्ही खाली self declaration form marathi word format, स्वयंघोषणापत्र नमुना, स्वयंघोषणापत्र pdf, स्वयंघोषणापत्र नमुना pdf, स्वयंघोषणापत्र पीडीएफ, स्वयंघोषणापत्र डाउनलोड करू शकता.

सोबत पुढील कामासाठी जसे कि- self declaration form marathi for domicile certificate, स्वयंघोषणापत्र उत्पन्न, स्वयंघोषणापत्र उत्पन्न दाखला, scholarship self declaration form marathi, self declaration form in marathi for shop act ही खालील स्वयंघोषणापत्र डाउनलोड करू शकता.👇

Download Here

स्वयंघोषणापत्र मराठी pdf नमुना

Self-Declaration-स्वयंघोषणा-MarathiForm-1


Self Declaration English pdf नमुना-

Self Declaration स्वयंघोषणा-English Form


Leave a Comment