७ व्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता नगदी मिळणार! आजचा शासन निर्णय पहा.
शासन अधिसूचना वित्त विभाग,दिनांक ३० जानेवारी,२०१९ अन्वये ७ व्या वेतन आयोगाची थकबाकी सन २०१९-२० पासून पुढील ५ वर्षांत, ५ समान हप्त्यांत कर्मचाऱ्यांच्या गविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचा आणि सेवानिवृत्त कर्मवान्यांना रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 7 Pay 5th Haptha
याबाबतची कार्यपद्धती शासन परिपत्रक, वित्त विभाग, दिनांक २० फेब्रुवारी, २०१९ अन्वये विहित केली आहे. तसेच राष्ट्रीय निवृतिवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम ५ वर्षात. ५ समान हप्त्यांत रोखीने अदा करण्याबाबत शासन परिपत्रक ३० मे. २०१९ अन्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या.
तसेच निवृत्तिवेतनाच्या थकबाकीची रक्कम ५ वर्षात, ५ समान हप्त्यांत रोखीने अदा करण्याचे दिनांक २४ जानेवारी, २०१९ व दिनांक १ मार्च, २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये आदेशित केले आहे.
शासन आता असे आदेश देत आहे की, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै, 2023 रोजी देय असलेल्या 7 व्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्तिवेतनाच्या थकबाकीच्या ५ व्या हप्त्याची रक्कम पुढे नमूद केल्याप्रमाणे यथास्थिती भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी अथवा रोखीने अदा करावी:-
(अ) निवृत्तिवेतनधारकांना निवृत्तिवेतनाच्या थकबाकीच्या ५ व्या हप्त्याची रक्कम माहे जून, २०२४ च्या निवृत्तिवेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी.
(ब) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या ५ व्या हप्त्याची रक्कम माहे जुन. २०२४ च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी.
(क) सर्व जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या ५ व्या हप्त्याची रक्कम माहे जून, २०२४ व्या वेतनासोबत अदा करण्यात यावी.
वरील (ब) आणि (क) मधील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत-
- (i) भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कग त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी आणि राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या कर्मचा-यांच्या थकबाकीची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी.
- (ii) जे कर्मचारी (भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसह) दिनांक १ जून, २०२३ ते या शासन आदेशाच्या दिनांकापर्यंत सेवानिवृत्त झाले असतील अथवा मृत्यू पावले असतील. अशा कर्मचा-यांना वेतनाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी.
२. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या ५ व्या हप्त्याच्या रकगेवर शासन परिपत्रक, दिनांक २० फेब्रुवारी, २०१९ गधील परिच्छेद क्र. १४ मधील तरतुदीनुसार दिनांक १ जुलै, २०२३ पासून व्याज अनुज्ञेय राहील.
३. गविष्य निर्वाह निधी योजनेव्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम शासन परिपत्रक. दिनांक २० फेब्रुवारी, २०१९ गधील परिच्छेद क्र. १४ गधील तरतूदी प्रगाणे काढता येणार नाही.
७ व्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता आदेश:-
