इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षा नवीन नियमावली नुसार मूल्यमापन कसे करावे ? 5th 8th varshik pariksha niyamavali

By Neha

Published On:

varshik-pariksha-niyamavali
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती तयारी Join Now

इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षा नवीन नियमावली नुसार मूल्यमापन कसे करावे ? 5th 8th varshik pariksha niyamavali


इयत्ता ५ वी ८ वी वार्षिक परीक्षा नवीन नियमावली

varshik pariksha niyamavali

शासन निर्णय २९ मे २०२३

शासन निर्णय ७ डिसेंबर २०२३

  • द्वितीय सत्र परीक्षा संकलित मूल्यमापन, वार्षिक परीक्षा द्वितीय सत्र अभ्यासक्रमावर आधारित.
  • इ. ५ वी – मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित व परिसर अभ्यास १-२ लेखी परीक्षा ४० गुण व तोंडी परीक्षा १० गुण असे एकूण ५० गुण
  • इ.८ वी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशाख लेखी परीक्षा ५० गुण व तोंडी १० गुण असे एकूण ६० गुण
  • इयत्ता ५ वी व ८ वी कार्यानुभव, चित्रकला, शारीरिक शिक्षण प्रचलित सर्वकाश मूल्यमापन श्रेणी देणे.
  • इयत्ता ५ वी सर्व विषय ५० प्रमाणे एकूण २५० गुण.
  • उत्तीर्ण गुण प्रत्येक विषय ३५% प्रमाणे १८ गुण आवश्यक.
  • सवलतीचे गुण १० तीन विषयात सवलत. ५ गुण जास्तीत जास्त एका विषयात देता येईल.
  • इ. ८ वी सर्व विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र
  • इयत्ता ८ वी सर्व विषय ६० प्रमाणे एकूण ३६० गुण.
  • सवलतीचे गुण १० तीन विषयात ५ गुण जास्तीत जास्त एका विषयात देता येईल.
  • प्रगती पुस्तक नाही- कार्ड देणे
  • वर्णनात्मक नोंदी करू नये.
  • परीक्षेस गैरहजर विद्यार्थी अनुत्तीर्ण समजण्यात येईल.
  • पुनर्रपरीक्षा केव्हा घ्यावी ? महत्वपूर्ण सूचना
  • अनुत्तीर्ण विषयाची पुनर्रपरीक्षा घेण्यात यावी.
  • कार्या, शा. शि, चित्रकला पुनर्रपरीक्षा नाही.
  • पुनर्रपरीक्षा निकाल नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ३ दिवस आधी जाहीर करणे.
  • पुनर्रपरीक्षेस सवलतीचे गुण ग्राह्य धरणे.
  • फेरपरीक्षेस गैरहजर विद्यार्थी अनुत्तीर्ण समजण्यास येईल.
  • इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी वर्गोन्नतीसाठी निकष खालीलप्रमाणे
  • इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी वार्षिक परीक्षा यांचे प्रती विषय एकूण गुण यांचे आधारावर उत्तीर्ण / अनुत्तीर्ण ठरविण्यात येईल.
  • इयत्ता ५ वी साठी प्रती विषय किमान १८ गुण (३५%) प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • इयत्ता ८वी साठी प्रती विषय किमान २१ गुण (३५%) प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • गुणपत्रकामध्ये श्रेणी ऐवजी गुण देण्यात येतील.
  • वार्षिक पुरीक्षेमध्ये विद्यार्थी कोणत्याही विषयामध्ये अनुत्तीर्ण झाल्यास अथवा कोणत्याही कारणामुळे वार्षिक परीक्षेस गैरहजर राहिल्यास तो अनुत्तीर्ण समजण्यात येईल. मात्र त्याला पुनर्परीक्षा देण्याची संधी उपलब्ध असेल.
  • इयत्ता ५ वी व इयत्ता ८वी तील विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास सवलतीचे गुण विहित केल्याप्रमाणे देण्यात येतील. मात्र सवलतीचे गुण देऊनही विद्यार्थी एक किंवा एकापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण होत असल्यास अशा विषयाची पुनर्परीक्षा घेण्यात येईल.
  • पुनर्परीक्षा घेण्यापूर्वी अनुत्तीर्ण झालेल्या विषयासाठी विद्यार्थ्यांना शाळेमार्फत अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करण्यात यावे. पुनर्परीक्षा देण्यासाठी पात्र ठरलेला एकही विद्यार्थी अतिरिक्त पूरक मार्गदर्शनापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी.
  • अतिरिक्त पूरक मार्गदर्शनासाठीचे वेळापत्रक, विद्यार्थी उपस्थिती, शिक्षक उपस्थिती याबाबतच्या नोंदी शाळास्तरावर ठेवण्यात याव्यात.

Leave a Comment