27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन उपयुक्त माहिती | 27 February Marathi bhasha Gaurav Day useful information |
१. महाराष्ट्रात दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.
२. हा दिवस मराठी कवी, नाटककार आणि कादंबरीकार कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो.
३. कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर असे आहे.
४.मराठी भाषेच्या समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
५.’महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४’ नुसार “महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठी असेल” असे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी जाहीर केले.
६. २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस “२७ फेब्रुवारी” हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले.
७. महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य असून राज्याच्या विविध भागांत मराठीची विविध रूपं पाहायला मिळतात.
८. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण अशा वेगवेगळ्या प्रांतात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषा मराठी भाषेला समृध्द करतात.
९. मराठी साहित्य संपदेत अनेक संत, थोर समाज सुधारक ,कवी, लेखक यांनी मोलाची भर घातली. महात्मा जोतीराव फुले यांनी लिहिलेले ग्रंथ, अखंड ,अलीकडच्या काळात साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे साहित्य हे महत्वाचे मानले जाते.
१०. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.