23 मार्च शहीद दिन भाषणे | 23 March Martyrs Day Speeches |
शहीद-ए-आझम वीर भगतसिंग
1. मी आज तुम्हाला शहीद ए आझम वीर भगतसिंग यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे.
2. वीर भगतसिंग यांचा जन्म 28.सप्टेंबर.1907 रोजी झाला.
3. पंजाब राज्यातील बंगा येथे त्यांचा जन्म झाला.
4. त्यांच्या आईचे नाव विद्यावती व वडिलांचे नाव किशन सिंग होते.
5. नौजवान भारत सभा, कीर्ती किसान पार्टी आणि हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनांमध्ये ते सक्रीय सहभागी होते.
6. “माझे जीवन मी हे सर्वोत्कृष्ट कामासाठी समर्पित केले आहे. देशाचे स्वातंत्र्य हेच माझे ध्येय आहे.” असे ते म्हणत.
7. साम्यवादी समाजरचना व शोषणमुक्त सक्षम समाज घडविण्यासाठी त्यांनी लेनिन, मार्क्स, टॉलस्टाॅय, गॉर्की यांचे साहित्य अभ्यासले होते.
8. दि. 23.मार्च.1931 रोजी सुखदेव व राजगुरू यांच्यासह भगतसिंगांना लाहोर येथे फाशी देण्यात आले.
9. इन्कलाब जिंदाबाद हा त्यांनी दिलेला नारा अनेक भारतीय तरुणांना प्रेरणा देणारा आहे.
10.त्यांच्या पावन स्मृतींना माझे विनम्र अभिवादन ….जय हिंद, जय भारत ….
थोर क्रांतिकारक राजगुरू
1. राजगुरू यांचे संपूर्ण नाव शिवराम हरि राजगुरू असे होते.
2. त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1908 रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड (आता राजगुरूनगर) येथे झाला.
3. राजगुरू हे लहानपणापासूनच अत्यंत शूर आणि धाडसी होते.
4. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र अतिशय प्रिय होते.
5. ते ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन HSRA या संघटनेत सामील झाले.
6. राजगुरू हे उत्कृष्ट नेमबाज होते आणि त्यांनी अनेक क्रांतिकार्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
7. भगतसिंग आणि सुखदेव यांच्यासोबत त्यांनी सॉन्डर्स हत्या प्रकरणात सहभाग घेतला.
8. सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
9. त्यांनी आपल्या बलिदानाने संपूर्ण भारताला प्रेरणा दिली.
10. राजगुरू हे अमर क्रांतिकारक म्हणून भारतीय इतिहासात अजरामर झाले.
त्यांच्या पावन स्मृतींना माझे विनम्र अभिवादन ….जय हिंद, जय भारत ….
थोर क्रांतिकारक सुखदेव
1. सुखदेव थापर यांचा जन्म 15 मे 1907 रोजी पंजाबच्या लुधियाना येथे झाला.
2. सुखदेव लहानपणापासूनच ब्रिटिशांविरोधात चिड होते आणि देशभक्तीने भारलेले होते.
3. त्यांनी शिक्षण घेत असताना देशभक्तीच्या चळवळीत उडी घेतली.
4. ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) या क्रांतिकारी संघटनेचे सक्रिय सदस्य होते.
5. सुखदेव यांनी भगतसिंग आणि राजगुरूसोबत मिळून अनेक क्रांतिकार्ये केली.
6. त्यांनी राष्ट्रीय महाविद्यालय, लाहोर येथे क्रांतिकारक विचारांचा प्रसार केला.
7. 23 मार्च 1931 रोजी सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली.
8. या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली.
9. त्यांच्या बलिदानाने भारतीय स्वातंत्र्यलढ्यात नवीन उर्जा निर्माण केली.
10. शहीद दिवस (23 मार्च) हा भारतात या तिन्ही क्रांतिकारकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.